रशियामध्ये पर्यटन कर लागू

रशियामध्ये आजपासून पर्यटन कर लागू करण्यात आला आहे. अधिकृत रशियन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हॉटेल्स किंवा निवासस्थानांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर आजपासून पर्यटकांना एक टक्का पर्यटन कर द्यावा लागणार आहे. जुलै २०२४ मध्ये रशियन टॅक्स कोड मधल्या सुधारणांनुसार ही करआकारणी सुरु झाली आहे. या सुधारणांनुसार वर्ष २०२७ पासून या करात वाढ होऊन तो तीन टक्के होईल.