January 22, 2026 3:11 PM | beed | toor

printer

बीड जिल्ह्यात खरीप हंगाम तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय हमीभाव केंद्रावर नोंदणी प्रक्रियेला सुरूवात

बीड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ मधील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय हमीभाव केंद्रावर नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. २० फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करता येणार आहे. केंद्र सरकारने यावर्षी तुरीसाठी ८हजार रुपये प्रति क्विंटल असा आधार भाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. बीड, परळी, अंबाजोगाई आणि गेवराई यांसारख्या प्रमुख केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.