टोमॅटोच्या किरकोळ दर देशभरात वाढल्याचं सरकारने म्हटलं आहे. स्थानिक कारणांमुळे हे दर वाढले असून उत्पादनातील तूट किंवा मागणी-पुरवठा असमतोल याचा यात काही संबंध नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीत टोमॅटोचे दर ७३ रुपये किलो तर मुंबईत ५८ रुपये किलो झाल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. पावसामुळेच जुलै महिन्याच्या शेवटी टोमॅटोचे दर ८५ रुपये प्रति किलो झाले होते. गेल्या आठवड्यात आझादपूर मंडईत आवक वाढल्यामुळे हे दर कमी होत आहेत, असंही मंत्रालयाने म्हटलं आहे.
Site Admin | August 8, 2025 7:55 PM | Tomato
मुसळधार पावसामुळे मुंबईत टोमॅटोचे दर ५८ रुपये किलो
