झारखंडमधे उमेदवारी अर्जांची छाननी सुरु

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. एकंदर ८०५ उमेदवारांनी या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरले आहेत. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर आहे. १३ नोव्हेंबर रोजी या टप्प्यातल्या ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.