टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा कॅनडासोबत सामना

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल.

काल वेस्ट इंडिजच्या लॉडरहिलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेपाळवर अवघ्या एका धावेनं विजय मिळवला. तर अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला. चांगल्या धावगतीच्या जोरावर  अमेरिकेने सुपर आठमध्ये प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या संघांनं पदार्पणातच सुपर आठमध्ये प्रवेश करत विक्रम केला आहे. अ गटातून सुपर आठमध्ये भारत आणि अमेरिकेनं प्रवेश केला आहे तर पाकिस्तान आणि आयर्लंड हे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.