तिसऱ्या तंबाखू मुक्त युवक मोहिमेचा प्रारंभ आज नवी दिल्ली इथं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत झाला. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं तंबाखू विरोधी संदेश आणि आरोग्याबाबत इशारा देत तंबाखूचा प्रसार रोखण्यात भारतानं आघाडी घेतली आहे, असं पटेल यांनी यावेळी सांगितलं. सर्व प्रकारच्या तंबाखूच्या जाहिराती, प्रसिद्धी आणि प्रायोजकत्वाला सक्त मनाई करत तंबाखूच्या प्रसाराला आळा घातला आहे असं त्या म्हणाल्या.
Site Admin | October 9, 2025 8:34 PM | Tobaco
तिसऱ्या तंबाखू मुक्त युवक मोहिमेचा प्रारंभ