डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 27, 2025 3:52 PM | Farmer

printer

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळण्यासाठी पुणे इथं कापूस, हळद आणि मका पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पुणे इथं कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी भविष्यात त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीत चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. हा उपक्रम कृषी क्षेत्रात विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना म्हटलं आहे.

 

हेजिंग डेस्क’ मध्ये भविष्यात विविध पर्यांयाचा विचार करण्यासाठी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी शेतकरी उत्पादक संघटना आणि क्लस्टर आधारित व्यवसाय संघटना यांना सेवा कमोडिटी कराराबद्दल तज्ज्ञ माहिती देतील. तीन हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना हेजिंग साधने आणि धोरणांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मका, कापूस आणि हळदीसाठी ॲन्युअल कमोडिटी प्राईस रिस्क असेसमेंट रिपोर्टस तयार करून यामध्ये पिकाची सद्यस्थिती, भविष्यकालीन अंदाज आणि धोरणविषयक उपाय सुचवले जातील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा