युक्रेनमध्ये रशियानं छेडलेलं युद्ध संपवण्यासाठी झालेल्या चर्चेच्या नव्या फेरीत, अमेरिकेच्या शिष्टमंडळानं काल फ्लोरिडा मध्ये रशियन अधिकाऱ्यांची भेट घेतली. ही चर्चा सकारात्मक होती, आणि ती आजही सुरु राहील, असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विशेष दूत किरील दिमित्रीव्ह यांनी बातमीदारांना सांगितलं.
दरम्यान, दोन्ही बाजूंनी ओलीसांची देवाणघेवाण सुलभ झाली, आणि राष्ट्रीय नेत्यांमधल्या बैठकींचा मार्ग मोकळा झाला, तर युक्रेन, अमेरिका आणि रशियाबरोबर त्रिपक्षीय चर्चेच्या प्रस्तावाला पाठिंबा देईल, असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी काल सांगितलं.