अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी एलटीटी मुंबई ते मडगाव आणि हडपसर ते हिसार दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. २६ मे पर्यंत अधिसूचित केलेल्या एलटीटी मुंबई ते मडगाव दरम्यान दर सोमवारी धावणाऱ्या साप्ताहिक रेल्वेचा कालावधी आता ९ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. २५ मे पर्यंत अधिसूचित केलेल्या दर रविवारी धावणाऱ्या मडगाव-एलटीटी मुंबई साप्ताहिक रेल्वेचा कालावधी ८ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. २६ मे पर्यंत अधिसूचित केलेल्या हडपसर-हिसार साप्ताहिक रेल्वेचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. २५ मे पर्यंत अधिसूचित केलेल्या हिसार-हडपसर साप्ताहिक रेल्वेचा कालावधी २९ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.