डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नांदेडमध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.

 

नांदेडमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहरातल्या आयटीआय मार्गावरच्या तिरंगा ध्वजापासून निघालेल्या या तिरंगा रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ करण्यात आली. 

 

पंजाबमधल्या अमृतसर इथं आज भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते तरुण चुग यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या आणि राष्ट्रगीत गायन करण्यात आलं. देशाच्या एकतेचं प्रतीक म्हणून १०० फूट लांबीचा तिरंगा घेऊन समाजातल्या सर्व स्तरातले  नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.