May 21, 2025 1:22 PM | Tiranga Yatra

printer

राज्यात तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. 

 

नागपूर शहर काँग्रेस आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे ‘तिरंगा यात्रा’ काढली होती. यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. 

 

लातूर जिल्ह्यातही शिवसेनेतर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यात सीमेवर सेवा बजावत असलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा तसंच सेवानिवृत्त जवानांचा सत्कार करण्यात आला.