भारतीय सेनादलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. भारतीय जनता पार्टीतर्फे आज छत्तीसगड, आणि उत्तरप्रदेशात तिरंगा यात्रा काढम्यात आली. महाराष्ट्रातही जनसामान्यांमधे ऑपरेशन सिंदूर बद्द्ल अभिमान आणि गौरवाची भावना व्यक्त होत आहे.
माजी सेनाधिकारी लेफ्टनंट जनरल कंवलजीत सिंग धिल्लाँ यांनी सेनादलांचं अभिनंदन केलं आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेच असल्याचं मत त्यांनी आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलं.