डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री गतीशक्ती बृहद आराखड्याला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे प्रंशसोद्गार

भारताच्या पायाभूत सेवा क्षेत्राचा कायापालट करण्यात एक परिवर्तनकारी उपक्रम म्हणून उदयाला आलेल्या पीएम गतीशक्ती ब्रृहद आराखड्याला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. गतिशक्ति उपक्रमानं देशाच्या मल्टीमोडल संपर्कव्यवस्थेला लक्षणीय चालना दिली असून प्रत्येक क्षेत्रात जलदगतीनं आणि कार्यक्षम विकास साध्य करण्यात मोलाचं योगदान दिलं आहे असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 

 

विविध भागधारकांच्या समन्वयामुळे लॉजिस्टिक्सला चालना मिळाली आहे, विलंब कमी होऊ लागला आहे आणि अनेकांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. गतिशक्ति उपक्रमाच्या माध्यमातून विकसित भारताच्या स्वप्नाच्या ध्येयपूर्तीकडे वेगाने वाटचाल सुरु असून त्यामुळे प्रगती, नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रेरणा मिळत आहे, असं ते म्हणाले.