जम्मू काश्मीरमधल्या कुलगाममध्ये आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत आज आणखी एक दहशतवादी ठार झाला. आतापर्यंत या चकमकीत एकूण तीन दहशतवादी ठार झाले आहेत.
लष्करी कारवाईशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं की, शुक्रवारी रात्री ८ वाजता देवसरमधे अखलच्या जंगलात चार ते पाच दहशतवादी लपल्याची खबर मिळाल्यावर लष्कराच्या ९ राष्ट्रीय रायफल्सनं जम्मू-काश्मीर पोलीस, कुलगाम पोलीस आणि सीआरपीएफ जवानांसह शोध मोहीम सुरू केली आहे.