भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन सामन्यांच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून पर्थ इथं सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण भारतीय फलंदाज पारशी चमक दाखवू शकले नाही. सलामीवर रोहित शर्मा ८ तर कर्णधार शुभमन गिल दहा धावा करून झटपट बाद झाले. तर विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. पावसामुळे सामना सुरू व्हायला उशीर झाला, त्यामुळे हा सामना ३२ षटकांचा खेळला जाईल.
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या १६ षटकांमध्ये ४ बाद ५२ धावा झाल्या होत्या. दरम्यान पावसामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला.