त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याबाबतीत काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काल रात्री बैठक झाली, त्या बैठकीत ते बोलत होते. या विषयावर सांगोपांग चर्चा करून, सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचं ॲकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगानं नुकसान होऊ नये, यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करावं असा निर्णय या बैठकीत झालं.
यासंदर्भात मराठी भाषा अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेत्यांसह सर्व संबंधितांसमोर सादरीकरण आणि सल्लामसलत करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्यासंह संबंधित अधिकारी उपस्थित होते.