डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 10, 2024 4:56 PM

printer

फुलंब्रीत दुकानाला लागलेल्या आगीत तीघांचा मृत्यू, दोघं जखमी

फुलंब्रीतल्या दरीफाटा इथे काल मध्यरात्री एका दुकानाला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हे दुकान प्लास्टिक साहित्य विक्रीचं असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती आहे. आग लागल्याचं समजताच दुकान मालकानं दुकान उघडलं. त्यावेळी आगीमुळे दुकानात तयार झालेल्या गॅसचा स्फोट झाला आणि त्यात तीन जणांचा मृत्यू झाला. नितीन नागरे, गजानन वाघ आणि राजू पटेल अशी या तिघांची नावं आहेत. या दुर्घटनेतल्या गंभीर जखमी झालेल्या दोघांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.