राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल पुण्याच्या नाना पेठेत गोळ्या झाडून हत्या झाली. दुचाकीवरुन आलेल्या १३ हल्लेखोरांनी आंदेकर यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला आणि नंतर गोळ्या झाडल्या असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३ जणांना अटक केली असून पुढचा तपास सुरु आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Site Admin | September 2, 2024 4:04 PM | NCP
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक
