नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव

नेत्रदान हे महान कार्य असून यामुळे आपल्या मृत्यूनंतरही आपण इतरांच्या माध्यमातून जगू शकतो, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे जे रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन इथं २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात नेत्रदान संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा आज राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वांनी नेत्रदान करावं असं आवाहन करत नेत्रदान ही चळवळ बनावी अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.