यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण बिर्ला यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकासगाथेत त्यांनी दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या स्मृतिदिनी मुंबईत येत्या २४ एप्रिलला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. गुरु दीनानाथजींच्या समर्पण, उत्कृष्टता आणि सेवेच्या भावनेला मूर्त रूप देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
अभिनेत्री श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णी, अभिनेते सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, गायिका रिवा राठोड, साहित्यिक श्रीपाल सबनीस, व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांनाही या कार्यक्रमात विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.