डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत – अमेरिका व्यापार समझोता आणि भारत – पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीसाठी अमेरिकेबरोबर कोणत्याही पातळीवर कधीही चर्चा झाली नव्हती, प्रधानमंत्र्यांचं स्पष्ट प्रतिपादन

भारत – अमेरिका व्यापार समझोता आणि भारत – पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीसाठी अमेरिकेबरोबर कोणत्याही पातळीवर कधीही चर्चा झाली नव्हती असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना स्पष्ट सांगितलं आहे. परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं की प्रधानमंत्री मोदी यांची अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर जवळजवळ ३५ मिनिटं दूरध्वनीवरुन चर्चा झाली. त्यावेळी मोदी यांनी स्पष्ट केलं की भारत- पाकिस्तान दरम्यान पाकिस्तानच्या विनंतीवरुन थेट सेनादल पातळीवर चर्चा झाली होती. भारताने आजवर कधीही त्रयस्थांची मध्यस्थी स्वीकरलेली नाही आणि यापुढेही स्वीकारणार नाही, याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. या संभाषणात त्यांनी ट्रंप यांना ऑपरेशन सिंदूर विषयी माहिती दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा