फॅटी लिव्हर आजाराची चाचणी तातडीनं तयार करण्याची गरज – मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

फॅटी लिव्हर या यकृताच्या आजाराच्या विविध स्तरांचं सहज निदान करता यावं यासाठी सोपी आणि परवडणाऱ्या दराची निदान चाचणी तातडीनं तयार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत, यकृत आणि पित्तविषयक विज्ञान संस्थेत यकृताचे आजार टाळण्यासाठी, भारत आणि फ्रान्सनं हाती घेतलेल्या एका उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. भारताच्या प्रत्येक तिसऱ्या नागरिकाला फॅटी लिव्हर हा आजार असल्याची माहिती त्यांनी दिली.