भविष्यातला माणूस घडविण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यानुसार शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट्य निश्चित करण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपुरात मंथनच्या वतीनं आयोजित शिक्षक परिसंवादात बोलत होते. जगात समाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. आपल्याला विश्वगुरू व्हायचं आहे, जगातली तिसरी अर्थव्यवस्था व्हायचं आहे आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे, असं प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे. विश्वगुरू म्हणून मान्यता फक्त आर्थिक आधारावर शक्य नाही. त्यासाठी आपली संस्कृती, परंपरा, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती याचा देखील विचार करावा लागेल, असं ते म्हणाले.