डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचा विजय

मराठवाडा साहित्य परिषद – मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचे सर्व २२ सदस्य बहुमतानं विजयी झाले. या पॅनलच्या विरोधात डॉ. सर्जेराव जिगे यांच्या परिवर्तन मंचाचे १५ उमेदवार उभे होते. काल छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेच्या कार्यालयात मतमोजणी पार पडली. येत्या पंधरा दिवसांत कार्यकारी मंडळाची बैठक होवून पदाधिकारी निवडले जाणार आहेत. आपण सहाव्यांदा ही निवडणूक जिंकलो असून, आता मराठवाड्यातला वा.ड्मयीन इतिहास लिहून तो प्रकाशित करण्याच्या उपक्रमासह मराठवाड्यातल्या मराठी भाषेच्या शब्दकोष निर्मितीचं काम केलं जाणार असल्याचं प्राचार्य ठाले पाटील यांनी सांगितलं.