डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 12, 2025 2:46 PM | United Kingdom

printer

नायटेड किंग्डम मध्ये आजपासून युरोपमधल्या देशांमधून मांस आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर बंदी

युरोपमधल्या प्राण्यांमध्ये फूट अँड माऊथ आजार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर युनायटेड किंग्डमनं आजपासून युरोपमधल्या देशांमधून मांस आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर बंदी घातली आहे.

युकेमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आपल्यासोबच वैयक्तिक वापरासाठी मेंढी, बकरी, गाय, डुकराचे मांस आणि दुग्धजन्य पदार्थ आणता येणार नाहीत. याशिवाय सँडविच, चीझ, कच्चं मांस, आणि दूध आणण्यावर ही बंदी असणार आहे.  फूट अँड माऊथ आजार हा प्राण्यांमध्ये होणारा विषाणूजन्य आजार आहे.