डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 18, 2025 2:49 PM | T20

printer

19 वर्षांखालील महिलांच्या वीस षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेला आज मलेशियात सुरूवात

महिला क्रिकेटमधे १९ वर्षांखालील ट्वेंटी- ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून मलेशिया इथं सुरूवात होत आहे. यामध्ये १९ संघ सहभागी होत आहेत. या संघाची चार गटात विभागणी केली असून, भारताच्या गटात मलेशिया, श्रीलंका, वेस्टइंडिज हे संघ आहेत. भारताचा पहिला गटसाखळी सामना उद्या वेस्टइंडिजबरोबर होणार आहे. आज सहा साखळी सामने होणार आहेत.