भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज संध्याकाळी जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावार खेळला जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ नं आघाडीवर आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे आठ वाजता हा सामना सुरू होईल.