डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हरियाणातल्या नव्या सरकारचा शपथविधी १७ ऑक्टोबरला

हरियाणातल्या नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी १७ ऑक्टोबरला होणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह काही मंत्री पंचकुलामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 

नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्त्वाखालच्या आघाडीनं काल जम्मू-काश्मिरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी दावा सादर केला. नॅशनल कॉन्फरन्सच्या विधीमंडळ पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी काल नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस, आम आदमी पार्टी, माकप आणि काही अपक्षांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना सादर केलं. शपथविधीची तारिख निश्चित करायची विनंती नायब राज्यपालांना केल्याचं अब्दुल्ला म्हणाले.