दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातली सगळ्या भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्ये हलवण्याच्या निर्देशाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल राखून ठेवला. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या पीठानं या विषयाची स्वतःहून दखल घेऊन दिलेल्या निर्देशांवर न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजरिया यांच्या पीठानं सुनावणी घेतली. या कुत्र्यांना हलवण्याचे निर्देश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या इतर पीठांनी तत्सम प्रकरणांमध्ये दिलेल्या निर्देशांशी विसंगत असल्याचा मुद्दा काल काही वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमोर उपस्थित केला होता. त्यानंतर हे प्रकरण तीन नव्या न्यायाधीशांच्या पीठाकडे देण्यात आलं.
Site Admin | August 14, 2025 2:44 PM | Supreme Court
दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला
