डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. येत्या २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या परीक्षेला देशभरातले ९ लाख परीक्षार्थी बसणार असून त्यामुळे त्याबाबत ऐनवेळी तारीख बदलता येणार नाही, असं स्पष्ट करून सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतल्या पीठाने ही याचिका फेटाळली.