ओला, उबेर, रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार ‘छावा राइड’ या ॲपच्या माध्यमातून राज्य सरकार नागरिकांना खासगी वाहतूक सुविधा पुरवणार आहे.
या ॲपवरुन नागरिकांना रिक्षा, टॅक्सी आणि बसचे आरक्षण करता येईल. एसटी महामंडळ हे ॲप सुरू करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.