पश्चिम बंगालमधल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही, ज्यूनियर डॉक्टरांच्या संघटनेचा आरोप

पश्चिम बंगालमधल्या कोलकता डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही, कोणतंही लेखी आश्वासन द्यायला सरकार तयार नाही, असा आरोप ज्यूनियर डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. राज्य सरकार आणि ज्यूनियर डॉक्टर यांच्यात काल बैठक झाली, मात्र यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन सुरू राहील असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.