डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

रायगड अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर

रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघाली होती. या बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. वाटेत ताम्हिणी घाटातल्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचं अर्थसहाय्य करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे.