बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं दोघांना घेतलं ताब्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप इथं काल पहाटे गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 61 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर झाराप इथं संशयित वाहनाची तपासणी करत असताना ट्रकमध्ये ही दारू आढळून आली.