October 23, 2024 2:23 PM | Cricket

printer

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या पुण्यात होणार

 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे.

 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला बंगळुरू इथं पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागला असल्यानं हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ निकराचे प्रयत्न करेल. यजमान संघ सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत १- ० अशा पिछाडीवर आहे. भारतीय संघात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा उर्वरित मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.