अमेरिका आणि इराण दरम्यान तेहरान अणू प्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता

अमेरिका आणि इराण यांच्यातील तेहरान अणू प्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता आहे. इटलीचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अंटोनिओ ताजानी यानी ही बैठक रोममध्ये आयोजित करण्यास रोम तयार असल्याचं काल जाहीर केलं. ताजानी सध्या जपानच्या दौऱ्यावर असून, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. अमेरिका आणि इराण यांच्यातील अण्वस्त्राबाबतचा संघर्ष चर्चेनं सुटेल आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत मिळेल, असंही ते म्हणाले. या चर्चेसाठी ओमान मध्यस्थाची भूमिका बजावत असून, पहिली फेरी १२ एप्रिल रोजी ओमानमध्ये झाली होती. त्यावेळी दोन्ही देशांनी सकारात्मक आणि ठोस चर्चा झाल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अब्बास अराघाची याबाबत सल्ला मसलतीसाठी रशियाला जाणार असून, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.