डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 17, 2024 10:58 AM | nadal day

printer

नौदल कमांडर परिषदेची 2024 साठीची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्ली इथं सुरू

नौदल कमांडर परिषदेची 2024 साठीची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्ली इथं सुरू होत आहे. नौदल कमांडर्समधील महत्त्वाच्या सामरिक, आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणारी ही परिषद म्हणजे सर्वोच्च पातळीवरील द्विवार्षिक कार्यक्रम आहे. चार दिवसीय परिषदेचा प्रारंभ नौदलप्रमुखांच्या बीजभाषणानं होणार आहे. या परिषदेदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गुरुवारी नौदलाच्या कमांडर्सना राष्ट्रीय सुरक्षा आणि आगामी काळातील अपेक्षा याच्याशी संबंधित मुद्द्यांवर संबोधित करण्याची शक्यता आहे.