महाविकास आघाडीचं जागावाटप आज पूर्ण होण्याची शक्यता

महाविकास आघाडीचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २१६ जागांवर सहमती झाली आहे, उरलेल्या जागांवर आजच्या बैठकीत सहमती होईल, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकारपरिषदेत  सांगितलं. काँग्रेसच्या ८४ जागांवरच्या उमेदवारांची छाननी झाली आहे. रविवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर या ८४ किंवा काँग्रेसच्या सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. समाजवादी पक्षाला महाविकास आघाडी काही जागा देणार आहे, असंही ते म्हणाले. राज्याच्या ८ विभागात महाविकास आघाडीच्या किमान ३ सभा घेण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.