युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात अलीकडेच समावेश झालेल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या व्यंकट बुरुजाची समुद्रातली खालची बाजू लाटांच्या माऱ्यानं ढासळली आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या स्थानिकांच्या निदर्शनाला ही बाब आली. ही माहिती पुरातत्त्व विभागाला देण्यात आली आहे.
बुरुजाच्या पायाकडचा सुमारे दोन मीटर उंच आणि सुमारे १५ फूट रुंद भाग लाटांच्या माऱ्यामुळे ढासळला असून असून तिथल्या तटबंदीला मोठं भगदाड पडल आहे. या तटाची लवकरात लवकर डागडुजी करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.