डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येणार

राज्यातल्या शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितलं आहे. ते काल विधान परिषदेत सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. तांबे यांनी, कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या थंड पेयांच्या विक्रीबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.