डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नोईस यांना जाहीर

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नोईस यांना दिला जाणार आहे. माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गोव्यात २० नोव्हेंबरपासून हा महोत्सव सुरू होणार असून २८ नोव्हेंबरपर्यंत सुरू असेल. ऑस्ट्रेलिया या वेळेचा ‘फोकस कंट्री ऑफ द इयर’ आहे. या महोत्सवासाठी १०१ देशांतून १ हजार ६७६ प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी ८१ देशातले १८० चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

भारतीय सिनेमा देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान देत असल्याची माहिती माहिती प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी दिली. नव्या चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट नवोदित भारतीय दिग्दर्शक पुरस्कार यंदापासून सुरू होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.