देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असते, असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं. विकसित भारत युवा नेता संवाद 2026 परिषदेचं उद्घाटन मांडवीय यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञान, उद्योग, प्रशासन, शाश्वत पर्याय आणि सामाजिक विकास अशा क्षेत्रांमध्ये विविध उपाय सुचवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावं, हे या संवादामागचं उद्दिष्ट असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं. भारतापुढे केवळ देशाच्या सीमा संरक्षित ठेवण्याचंच आव्हान नाही, तर आर्थिक आघाडीवरही देशाला सज्ज राहावं लागतं, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.