डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 21, 2024 7:36 PM | Rain

printer

देशातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास येत्या सोमवारपासून सुरु होण्याची शक्यता

देशातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास येत्या सोमवारपासून सुरु होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवली आहे. 

धाराशिवमध्ये कळंब तालुक्यात भाटशिरपूरा इथं वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. परतीच्या पावसानं नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये सोयाबीन काढणीच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला. सांगलीत संध्याकाळी मिरज, तासगाव, कवठेमहाकाळ, पलूस या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. 

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.