डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्र्यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया-युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल, अशी आशा संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे. त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलं आहे. अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटींसह सर्वसाधारण सभेचे ठराव, आंतरराष्ट्रीय कायदा आणि प्रादेशिक एकात्मतेसाठीचे प्रयत्न यामुळे हा संघर्ष थांबवण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. रशियानं लष्करी कारवाई थांबवावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं किमान तीन ठरावांमध्ये केली आहे, तर एका ठरावात युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे, असंही दुजारिक यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.