डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 3, 2024 1:50 PM | PM Narendra Modi

printer

सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी कृषिक्षेत्र असल्याचं प्रधानमत्र्यांचं प्रतिपादन


जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं ३२व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्या वेळी ते बोलत होते. सरकार कृषी क्षेत्रात विविध सुधारणा करत असून यामागे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याचा हेतू आहे, सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी कृषिक्षेत्र आहे, असं ते म्हणाले.

 

तृणधान्यं, दूध, डाळी आणि मसाल्यांचं सर्वात जास्त उत्पादन भारतात होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशात रसायनमुक्त, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शाश्वत शेतीवर मोठा भर देण्यात आल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. देशात कृषिक्षेत्रातलं संशोधन आणि शिक्षणासाठी चांगलं वातावरण असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यंदा या परिषदेत सुमारे ७५ देशांच्या एक हजारापेक्षा जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. यावर्षीची परिषदेची मध्यवर्ती संकल्पना ‘शाश्वत कृषी-अन्न प्रणालीच्या दिशेने परिवर्तन’ अशी आहे..