डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज पुण्यातल्या स्वारगेट-सिविल कोर्ट मेट्रोचं आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातल्या ११ हजार २०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामाचं उद्घघाटन, भूमीपूजन करणार आहेत. यावेळी पुण्यातल्या स्वारगेट ते सिवील कोर्ट या भुयारी मेट्रोचंही उद्घघाटन करतील. त्यांच्या हस्ते स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचं भूमीपुजन आणि पुण्यातल्या भिडेवाडा इथल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या शाळेच्या स्मारकाच्या कामाचं भूमीपुजनही ते करणार आहेत. छत्रपती संभाजी नगर जवळच्या बिडकीन इथल्या ७ हजार ८५५ एकर क्षेत्रातल्या राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्राचही लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. तसंच ते सोलापूर विमानतळाचं उद्घघाटनही करतील.