लेहमधील शिंकुनला बोगदा प्रकल्पाच्या कामाचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रारंभ

लेहशी कोणत्याही हवामानात संपर्क कायम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, शिंकुन ला बोगदा प्रकल्पाचं काम आज सुरू होणार असल्याची माहितीही प्रधानमंत्र्यांनी दिली. हा चार किलोमीटर लांबीचा ट्विन ट्यूब बोगदा निमू-पदुम-दारचा रस्त्यावर सुमारे पंधरा हजार 800 फूट उंचीवर बांधण्यात येत आहे. हा जगातील सर्वात उंच बोगदा असेल. या बोगद्यामुळं सशस्त्र दलांना जलद हालचाल करणं शक्य होणार असून, लडाखमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासही मदत होणार आहे.