डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप

भुवनेश्वर इथे आयोजित अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. तीन दिवस चाललेल्या या परिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी देशातल्या विविध राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. सायबर गुन्हे, किनारीपट्टी लगतची सुरक्षा, माओवादी बंडखोरी हे चर्चेचे विषय होते. भारताच्या विकासात अडथळा आणणाऱ्या बाबी, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि तस्करी, देशांतर्गत नक्षलवादाचं आव्हान या मुद्यांवर यावेळी चर्चा  करण्यात आली. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पोलिसांसमोरची आव्हानं, पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न या विषयांवर मार्गदर्शन केलं. आपला भुवनेश्वर दौरा आटोपून प्रधानमंत्री आज संध्याकाळी दिल्लीला परतले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.