December 21, 2025 2:38 PM | narendr modi

printer

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आसाममधे नामरूप इथं १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या खत प्रकल्पाचं भूमीपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या हस्ते नामरूप इथं १२ हजार कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचं उद्घाटन झालं. आसाम विकासाच्या मार्गावर वेगाने प्रगती करत असून दिब्रू गढ ज्या औद्योगिक प्रगतीची स्वप्न पाहत होता, तो अध्याय आता सुरू झाला आहे, असं प्रधानमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी शहीद स्मारक क्षेत्र इथे अवैध स्थलांतरितांविरुद्धच्या आसाम आंदोलनातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीतल्या बोटीवर स्थानिक शाळांमधल्या २५ विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा केली. 

प्रधानमंत्र्यांनी काल आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुवाहाटीत गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलं. जवळपास सव्वा कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेली ही इमारत एक लाख चौरस मीटरपेक्षा अधिक परिसरात पसरलेली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.