डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवर जनतेच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

ओदिशा पाठोपाठ, हरियाणा, आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय हा लोकांचा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवरचा विश्वास दर्शवतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर असून आज भुवनेश्वरमध्ये बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ त्यांची एक सभा झाली.

केंद्रातलं भाजपा सरकार ओदिशाला प्राधान्य देत असून ओदिशामध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यावर लगेच महिलांसाठी सुभद्रा योजनेसारखी अनेक मोठी पावलं उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधकांचा संविधानावर विश्वास नसल्याचं सांगत विरोधक विकासाची गती रोखत असल्याची टीका त्यांनी केली. प्रधानमंत्र्यांनी यावेळी विमानतळ ते राजभवन असा रोड शोही केला. पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री मोदी शनिवार आणि रविवारी भुवनेश्वरमध्ये असतील. भुवनेश्वर मधल्या भाजप मुख्यालयात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.